आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे निधन, श्रीरामपूरमध्ये अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब शिंदे (वय 86) यांचे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती.
शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा वाड्‌मय निर्मितीचा पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, जीवन साधना गौरव पुरस्कार आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोठे योगदान होते.
शिंदे यांच्या निधनामुळे रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज दुपारी श्रीरामपूरमध्ये त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.