आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RBI Governor Raghuram Rajan Describes Story Of His Life

आज यशस्वी; मात्र, एकेकाळी होतो अपयशी, रघुराम राजन यांनी मांडला प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आपण जेव्हा यशस्वी व्यक्तीला बघतो तेव्हा त्याचे केवळ यशच पाहतो. ते मिळवण्याच्या प्रयत्नात तो किती वेळा अपयशी ठरला, हे कुणाला जाणून घ्यायचे नसते. खरे तर अपयशाचा सामना केल्याशिवाय एखादाच यशस्वी झाला असावा. आरबीआय गव्हर्नर व मुख्य आर्थिक सल्लागारही हेच सांगू इच्छितात...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या (एनआयबीएम) दीक्षांत सोहळ्यासाठी शुक्रवारी पुण्यात रघुराम राजन व अरविंद सुब्रमणियन आले होते. व्यासपीठावर अनेक मान्यवर, तर समोर होते पदवीधारक विद्यार्थी.चर्चा होत होती ती करिअर व त्यातील यश-अपयशाची. इतक्यात राजन म्हणाले - ‘मी माझी कहाणी ऐकवतो. त्या वेळी मी आयएमएफ, तर अरविंद संशोधन विभागात होते. आम्ही एक शोधनिबंध तयार केला. विषय होता - "विकसित देशांची मदत वाया जाते'. तो ‘ग्लेनईगल्स समिट’मध्ये सादर करायचा होता. यात फक्त श्रीमंत देश भाग घेत असतात. त्यात विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीवर चर्चा होणार होती. मात्र, समिटच्या आठवडाभर आधी आमचा शोधनिबंध ‘जबाबदार’ पत्रकारांच्या हाती लागला. बातमी प्रसिद्ध झाली. हेडलाइन होती - ‘आयएमएफच्या दृष्टीने गरीब देशांना दिली जाणारी आर्थिक मदत असते निरुपयोगी.’ जगभरात वाद झाला. १८ देशांच्या अर्थमंत्र्यांनी आयएमएफ प्रमुखांना फोन केले. संशोधनावर माेठी टीका झाली. यानंतर आम्ही तीन वेळा शोधनिबंध तयार केला. तरीही तो नामंजूर झाला. मात्र, प्रकाशनानंतर तो सर्वाधिक वाचला गेला. राजन यांचे बोलणे संपताच अरविंद म्हणाले. आता माझे एेका... आज मला यशस्वी समजले जाते. मात्र मी आज अपयशाविषयी बोलतो. आधी आयएएस परीक्षेत नापास झालो. नंतर आयएमएफच्या इच्छित शाखेतही प्रवेश जमला नाही. पीएचडीसाठीचा शोधप्रबंधही यथातथाच दर्जाचा झाला. जितके अकॅडमिक पेपर मंजूर झाले, त्यापेक्षा अनेक नामंजूर करण्यात आले होते...
नंतर हेच अरविंद आणि राजन ठरले जागतिक दर्जाचे विचारवंत
नंतर याच अरविंद यांची जगाने प्रशंसा केली. २०११ मध्ये ‘फॉरेन पॉलिसी’ नियतकालिकाने त्यांना १०० सर्वोत्कृष्ट जागतिक विचारवंतांच्या यादीत स्थान दिले. दुसरीकडे, पहिल्या संशोधनात अपयशी ठरलेल्या रघुराम राजन यांचे संपूर्ण संशोधन अचूक ठरले. त्यांनीच २००८ मध्ये सर्वप्रथम वैश्विक मंदीचा इशारा दिला होता.
(राजन २००३ तेे २००६ पर्यंत आयएमफचे मुख्य अर्थतज्ज्ञ व संशोधन विभागाचे संचालक होते. अरविंदही त्या दिवसांत याच विभागात हाेते.)