आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीत असलेल्या अहमदनगरच्या टाेळीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या नगरच्या तीन जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. या वेळी त्यांच्या ताब्यातून कटावणी, चाॅपर, लाेखंडी गज, पक्कड, रस्सी, स्क्रू ड्रायव्हर व मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.   

सुमित ऊर्फ सुमड्या सुनील बाेराडे (रा.पैठण राेड, शेवगाव, अहमदनगर), नीलेश दादासाहेब केसभट (रा.पाथर्डी, अहमदनगर), राहुल नवनाथ कुसाळकर (रा. शेवगाव, अहमदनगर) या अशी अाराेपींची नावे आहेत.  त्यांचे दाेन साथीदार सुनील गरुड व गणेश घाेरपडे (रा. शेवगाव, अहमदनगर) हे पसार झाले असून त्यांचा शाेध घेण्यात येत अाहे. पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली.
 
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना अटक केली. मात्र,  त्यांचे दोन साथीदार फरार झाले. दरम्यान, या टोळीने राज्यातील इतर भागातही दरोडे टाकले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. याआधीही या  टोळीवर पुण्यात गुन्हे दाखल आहेत का ? याची माहितीही पोलिस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...