आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीराव-मस्तानीची रिअल लव्हस्टोरी, जी तुम्ही चित्रपटातही बघितली नसेल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बाजीराव बाळाजी भट (पेशवे) अर्थात थोरले बाजीराव हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. 1720 पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जाते. बाजीराव पेशवे यांची आज (18 ऑगस्ट) जयंती.

बाजीराव जितके पराक्रमी तितकेच ते दिलदारही होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढे एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो.

बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित‍ 'बाजीराव-मस्तानी' हा संजय लीला भन्सालीने दिग्दर्शित केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील दिपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंह यांच्या उत्कृष्ट भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. पण आज आम्ही आपल्यासाठी बाजीराव मस्तानीची 300 वर्षांपूर्वीची रिअल लव्हस्टोरी घेऊन आलो आहे, जी तुम्ही सिल्व्हर स्क्रीनवरही पाहिली नसेल.

'बाजीराव-मस्तानी' अजब लव्हस्टोरी...
भारतीय इतिहासात बऱ्याच प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. जोधा-अकबर, सलीम-अनारकली, बाजीराव-मस्तानी आदी. पण काही प्रेमकथा अजब असतात, याचा प्रत्यय 'बाजीराव आणि मस्तानी'वरून येतो. त्यात ऐतिहासिकता किती हा भाग वेगळा. मात्र, बाजीराव-मस्तानीची लव्हस्टोरी अनेक कारणामुळे वेगळी व अद्वितीय ठरते. ब्राह्मण व मुसलमान या दोन मानवनिर्मित ध्रुवांच्या मिलनाची ही कथा आहे. तशीच ती दोघांच्या पराजयाची व्यथा आहे. म्हणून हृदय पिळवटून काढणारी या प्रेमकथेला 'शोकगाथा'ही म्हणता येईल. 'बाजीराव-मस्तानी' प्रेम करण्याचे निसर्गदत्त स्वातंत्र्याविरुद्ध प्रस्थापित समाज व्यवस्था असा संघर्ष दिसतो.

इतिहासकार सांगतात की, मस्तानीच्या प्रेमाला तत्कालीन काळात हिणविले जात होते. मस्तानीकडे बाजीरावाची रखेल म्हणूनच पाहिले जात होते. परंतु, मस्तानी हिंदु- मुस्लिम संस्कृतीतील अजोड संगमाचे प्रतिक होती. ती श्रीकृष्ण भक्त होती. सोबतच ती नमाजही पठण करत होती. पूजाही करत होती आणि रोजा ही ठेवत होती.  

पुढील स्लाइडवर क्लिक करून ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा.. बाजीराव मस्तानीची रिअल लव्हस्टोरी...
बातम्या आणखी आहेत...