आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: नेपाळच्या घटनेने माळिणची आठवण, 170 लोकांचा गेला होता जीव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नेपाळच्या पर्वतीय भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे दोन दिवसापूर्वी नेपाळमध्ये लॅंडस्लाईड (भूस्लखन) झाले ज्यात 6 गावे गाडली गेली आहेत. यात सुमारे 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या या घटनेनंतर गेल्या वर्षी 30 जुलै रोजी पुण्याजवळील माळिण गावात झालेल्या लॅंडस्लाईडची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या घटनेत संपूर्ण माळिण गावच नष्ट झाले होते. माळिण गावातील एका चढाच्या भागावर राहत असलेली सर्व 44 कुटुंबातील एकून 170 लोकांचा प्राण गेला होता. एनडीआरएफच्या 300 जवानांनी आठवडाभर चालवलेल्या ऑपरेशनमध्ये अनेक लोकांना जीवंत बाहेर काढले होते. माळिण गाव पुण्यापासून 80 तर प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंगापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.
एसटी ड्रायवरने सर्वपथम दिली होती माहिती-
आंबेगाव तालुक्यातील माळिण गावाजवळील फुलवडे गावातील रहिवासी दत्ता वाळुंज यांनी दैनिक दिव्यमराठीला सांगितले होते की, भीमाशंकरजवळ एक डिंबे तलावापासून 25 किलोमीटर अंतरावर डोंगरद-यात माळिण गाव वसले होते. रात्री लॅंडस्लाईड झाल्यानंतर सकाळी पावने आठच्या सुमारास आहुपे-मंचर एसटी बस माळिण गावात नेहमीप्रमाणे दाखल झाली. तेव्हा बसचालका संपूर्ण गावच नष्ट झाल्याचे दिसून आले. याची सूचना चालकाने मंचर एसटी डेपोला दिली. डेपोने पोलिसांना माहिती दिली व त्यानंतर दोन तासांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले होते.
गावातील फक्त शाळा वाचली होती-

या भयंकर दुर्घटनेत संपूर्ण गावच नष्ट झाले होते. मात्र, गावाच्या तोंडाला असलेली एक प्राथमिक शाळा मात्र जशीच्या तशी राहिली होती. शाळेच्या इमारतीला काहीही नुकसान झाले नव्हते. या शाळेत झोपलेले चार गावकरी वाचले होते. एनडीआरएफ टीमने घटनेच्या तीन दिवसानंतर एका नवजात बाळाला जिंवत बाहेर काढण्यात यश मिळवले होते. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसह जगभरातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले होते. एवढेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व तत्कालीम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घटनेच्या दिवशीच भेट दिली होती. या घटनेची दखल जगभरातील मीडियाने प्रामुख्याने घेतली होती.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, पुण्याजवळील माळिण गावात कसे झाले होते भूस्खलन...
बातम्या आणखी आहेत...