आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ भाजीपाल्यापासून मद्यार्कनिर्मिती ! इंधन, वीज निर्मितीसाठीही फायदेशीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- टाकाऊ भाजीपाला, फळांपासून मद्यार्क निर्मिती करण्याचे प्रकल्प येत्या काळात राज्यात सुरू होणार आहेत. या संदर्भात ‘टाओ’ या अमेरिकी कंपनीशी वसंतदादा साखर संस्था (व्हीएसआय) करार करणार आहे. मद्य, इंधन आणि वीजनिर्मिती या तिन्हींसाठी मद्यार्क वापरले जाते.
ऊस, इथेनॉल आणि साखर संशोधनात ‘व्हीएसआय’ देशातील अग्रगण्य संस्था असून, शरद पवार त्याचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या नियामक मंडळाची सभा पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. या वेळी ‘टाओ’ कंपनीबरोबर सहयोग करार करण्यास मान्यता देण्यात आली. येत्या आठवडाभरात कराराची औपचारिकता पार पाडल्यानंतर ‘व्हीएसआय’च्या आवारात ‘टाओ’ प्रकल्पाची प्रत्यक्ष उभारणी सुरू होईल. राज्यातील मंड्यांमधून दररोज शेकडो टन फळे-भाजीपाला वाया जातो. फुकट जाणाºया या शेतमालाचा उपयोग मद्यार्क निर्मितीसाठी केल्यास कचºयाचा प्रश्न सुटेल आणि मद्यार्कातून आर्थिक लाभही होईल, या उद्देशाने ‘टाओ’शी करार करीत आहोत, असे ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
भाजीपाल्यापासून मिळणाºया मद्यार्काचा उपयोग भविष्यात कशासाठी करायचा याचा निर्णय सरकार घेईल. आमचा भर बायोइथेनॉल निर्मिती व त्याचा इंधन म्हणून वापर करण्यावर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळावर ‘यशवंत’ तोडगा- ‘व्हीएसआय 434’ या उसाच्या नव्या वाणास जॉइंट अ‍ॅग्रेस्कोने नुकतीच मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वाणाचे नामकरण ‘यशवंत’ करण्याचा निर्णयही मंडळाच्या बैठकीत झाला. पाण्याचा ताण सहन करणारे हे वाण टंचाईग्रस्त भागासाठी उपयुक्त आहे. ‘यशवंत’ वाणापासून हेक्टरी 12८.3९ टन ऊस व 2९.९3 टन साखर उत्पादन मिळत असल्याचे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
ज्वारीनंतर भाजीपाला... - सडक्या ज्वारीपासून मद्य निर्मितीस राज्यात कडाडून विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर टाकाऊ फळे-भाजीपाल्यापासून मद्यार्क निर्मितीत अडचणी येणार नाहीत, असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो. फळे व भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. वर्षाला ७4.८७ दशलक्ष टन फळे आणि 14६.55 दशलक्ष टन भाजीपाल्याचे उत्पादन भारतात होते. मात्र यातील सुमारे 1८ टक्के फळे-भाजीपाल्याची नासाडी होते. या नासाडीची किंमत वर्षाला 44 हजार कोटी असल्याचे सांगण्यात आले.