आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारे धुडकावून ‘एफटीअायअाय’त अांदाेलन सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिल्मअँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चाैहान यांच्या नियुक्तीला विराेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी यापुढेही अांदाेलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे. संस्थेने बडतर्फ करण्याचा इशारा दिल्यानंतरही त्याला भीक घालता विद्यार्थ्यांनी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून पुण्यात सुरू असलेल्या ‘एफटीअायअाय’च्या विद्यार्थ्यांच्या या अांदाेलनाला बाॅलीवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांनी पाठिंबा दिला अाहे.
मात्र, केंद्र सरकारने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. उलट संस्थेचे संचालक डी. जे. नरेन यांनी बुधवारी अांदाेलन थांबवल्यास विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र या कारवाईच्या धमकीला जराही भीक घालता विद्यार्थ्यांनी अांदाेलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.
सलमानखानचा पाठिंबा
अभिनेतासलमान खाननेही गुरुवारी या अांदाेलनाला पाठिंबा जाहीर केला. ‘गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा,’ असा सल्ला त्याने माध्यमांशी बाेलताना दिला.
बातम्या आणखी आहेत...