आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बहिणीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून, तिघांविरोधात गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच भावाने मित्राचा खून केला. ही घटना कात्रज येथे सोमवारी उघडकीस आली. संजय बागल (35) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संजयचे मित्राच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच मित्राला ही माहिती कळाली. रविवारी रात्री त्याने संजयला दारू पाजली व दोन मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली, यात संजयचा मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीवर 17 वर्षीय मुलाने केला अत्याचार-

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे एका सात वर्षाची चिमुरडी घराजवळ खेळत असताना, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. सदर मुलीच्या आईने जाब विचारला असता आरोपी मुलाच्या आई- वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.
विनयभंगप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा दाखल-
चांदणी चौक येथे नाकेबंदीदरम्यान वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पोलिस शिपाई यांनी एका कारचालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचा संशयावरून त्याची तपासणी सुरू केली. त्यावेळी चालकाच्या ओळखीच्या महिलेने तिथे येऊन त्यास विरोध दर्शवला असता, वाहतूक पोलिस निरीक्षकाने अपशब्द वापरून आपला विनयभंग केल्याची तक्रार सदर महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून पोलिस निरीक्षक सावंत शिपाई ए. पुंजरवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला.
बातम्या आणखी आहेत...