आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Relative Distroied Some Important Things In Ruby Hall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनीरुबी रुग्णालयात केली तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या सुमारे 40 ते 50 नातेवाइकांनी मंगळवारी सकाळी रुबी रूग्णालयाची तोडफोड केली तसेच सुरक्षा रक्षकांनाही मारहाण केली.याबाबत रुग्णालयाच्या वतीने कोरेगावपार्क पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमेय गलांडे (वय 19, रा.वडगावशेरी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मावसभाऊ अनिरुद्ध घुले याने सांगितले की, पोटात दुखत असल्याने अमेयला 22 ऑगस्ट रोजी रुबीत दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी डॉक्टरांनी त्याच्या काही चाचण्या करायच्या असल्याचे सांगत आठ हजार रुपये भरण्यास सांगितले. पुन्हा 26 ऑगस्टला त्याच चाचण्या व डायलेसिससाठी एक लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, मंगळवारी त्याचे निधन झाले. अमेयला किडनीचा आजार होता, संसर्ग झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. पॅथालॉजी लॅबमध्ये चौकशी केली असता त्याची चाचणी केली नसल्याचे सांगण्यात आले होते.