आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील चाेरीचे उर्वरित सर्व दागिने ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: तानाजी कुंडले
पुणे - पुण्यातील मंडई गणपतीच्या अंगावरील ४३ लाख रुपयांचे दागिने चाेरणारा अाराेपी तानाजी नारायण कुंडले (३४) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.टी.गाेटे यांच्या न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. दरम्यान, त्याच्या वडिलांनी पाेलिसांकडे सुपूर्द केलेल्या दागिन्यांशिवाय इतर सुमारे २५ लाखांचे तानाजीने दडवून ठेवले दागिनेही जप्त करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे.

तानाजीने चाेरी केल्यानंतर काही एेवज अापल्या घरी नेला, तर काही दागिने शिवाजी पुलाखाली असलेल्या पाइपलाइनमध्ये लपवून ठेवले हाेते. गुरुवारी सुमारे १८ लाखांचे दागिने तानाजीच्या वडिलांनी पाेलिसांकडे सुपूर्द केले. मात्र उर्वरित दागिने कुठे अाहेत याचा पाेलिस शाेध घेत हाेते. शुक्रवारी हे दागिनेही मिळवण्यात पाेलिसांना यश अाले. अाता चाेरीस गेलेले सर्व दागिने मिळाल्यामुळे गणेशभक्तांमध्ये समाधान व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, या चाेरीप्रकरणात तानाजीसाेबत अन्य कुणी साथीदार हाेते काय? याची चाैकशी पाेलिसांकडून केली जात अाहे. तसेच या चाेरीच्या पार्श्वभूमीवर अन्य देवस्थानांनाही सतर्क राहण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

चाैकशी करायचीय
पाेलिस निरीक्षक हेमंत भट यांनी अाराेपी तानाजीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. अाराेपीच्या वडिलांनी गुरुवारी दाेन साेन्याच्या साखळ्या पाेलिसांकडे दिल्याचे या वेळी सांगण्यात अाले. उर्वरित दाेन माेठे हार, माेहनमाळ, मंगळसूत्राचे दागिने यांचा शाेध अजून घ्यायचा अाहे. तसेच अाराेपीचे अाणखी काेण काेण साथीदार अाहेत का, अाराेपीने पुणे शहरात यासारख्या अाणखी माेठ्या स्वरूपाच्या घरफाेड्या केल्या अाहेत का, याची माहिती घेण्यासाठी त्याची पाेलिस काेठडीत रवानगी करावी, अशी मागणी पाेलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.