आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरू कसोटीपूर्वी टीम इंडिया पोहोचली सह्याद्रीच्या कुशीत, ताम्हणी घाटात केले Treking

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील कसोटी पराभवानंतर  टीम इंडियातील नैराश्य दूर करण्यासाठी आणि संघाला पुन्हा नवी उभारी मिळण्यासाठी कोच अनिल कुंबळे यांनी एक शक्कल लढवली. बंगळुरूला रवाना होण्यापूर्वी दोन दिवसांचा वेळ असल्याने या वेळेत काहीतरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी कुंबळेने मदत घेतली मित्र वसंत लिमये यांच्या. त्यांच्या मदतीने टीम इंडियाच्या खेळाडुंसाठी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ताम्हणी घाटात एका खास ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियातील सर्व सदस्य आणि सपोर्ट स्टाफ यांनी या ट्रेकचा आनंद लुटला. खेळाडुंचा तर गेल्या अनेक महिन्यांतली थकवा दूर झाल्याची प्रतिक्रिया क्रिकेटपटुंनी दिली. या ट्रेकनंतर टीम इंडिया दुसऱ्या दिवशी बेंगळुरूला रवाना झाली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...