आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retired Bank Officer Suicide After Wifes Murder At Pune

पत्नीचा खून करून बँक अधिकार्‍याची आत्महत्या; पुण्यातील थरारक घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सुमारे दीड कोटीचे डोक्यावर कर्ज झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या एका निवृत्त बँक अधिकार्‍याने पत्नीचा खून करत स्वत:ची जीवनयात्राही संपवली. कोथरूड परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. हेमंत मधुसूदन ताम्हणकर (वय ५८) साधना ताम्हणकर (वय ५६) अशी मृत दांपत्याची नावे आहेत.

हेमंत ताम्हणकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कुडाळचे रहिवासी होते. सन २००२ मध्ये त्यांनी युको बँकेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते मुलगा केतन याच्यासह कोथरूड भागातील भुसारी कॉलनीत एका किरायाच्या घरात राहत होते. ताम्हणकर यांनी कर्ज घेऊन टिळक रस्ता डहाणूकर कॉलनी येथे जिम सुरू केली होती. सन २००७ मध्ये पत्नी साधना यांना अर्धांगवायूचा झटका आला, तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही जिम बंद पडल्यामुळे ताम्हणकर यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. पत्नीचे आजारपण कर्जबाजारीपणा या नैराश्यातून हेमंत यांनी मंगळवारी आजारी पत्नीचा गळा दाबून स्वत: आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमागे आणखी काही कारणे आहेत का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.