आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Retired Officer Arrested Red Handed Taking Bribe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जात प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच मागणारा अधिकारी गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निवृत्त झाल्यानंतरही जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणा-या एका सेवानिवृत्त कर्मचा-याला 50 हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी अटक केली आहे. मधुकर पाटोळे असे या अधिकाºयाचे नाव असून सहायक संचालक पदावरून ते 31 जुलै रोजीच निवृत्त झाले आहेत. तरीदेखील त्यांनी या विद्यार्थ्यांकडून 1 आॅगस्ट रोजी पैसे स्वीकारले.
याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण येथील विद्यार्थी बापू पिंपळे व नेवासा येथील किशोर कबाडी या दोघांनी याबाबत लाचलुचपत विरोधी पथकाशी संपर्क साधला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर दोन्ही विद्यार्थी आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेत आहेत. शिक्षणासाठी हिंदू कुणबी जातीमुळे फीमध्ये सवलत मिळवण्यासाठी दोघेही जात पडताळणी कार्यालयात गेले होते. सदर कार्यालयात आपल्या कुटुंबीयांची सर्व कागदपत्रे त्यांनी सादर केली होती, परंतु पाठपुरावा करत असताना त्यांचा जात पडताळणीचा निर्णय राखीव ठेवण्यात आल्याचे कळाले. कार्यालयातील पोलिस शिपाई बाळासाहेब गोंदके याने विद्यार्थ्यांना सांगितले की, सहायक संचालक मधुकर पाटोळे पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. यानंतर हे विद्यार्थी पाटोळेंना भेटले असता त्यांना प्रत्येकी 30 हजार रुपयांची लाच मागितली, परंतु तडजोड करत प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याचे ठरले. रक्कम दिली नाही तर कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार नाही याची खातरजमा झाल्यावर विद्यार्थ्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे लाचलुचपत विरोधी पथकाने सापळा रचून पाटोळे व गोंदके यांना ताब्यात घेतले. पाटोळे 31 जुलै रोजी निवृत्त झाले असून सदर कारवाईच्या अनुषंगाने पोलिस त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानाची झडती घेत आहेत. त्यांच्या पुण्यातील होस्टेलच्या खोलीची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख 58 हजार 670 रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे.