आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंग रोड बाधित नागरिकांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा; आंदोलक- पोलिसांत झटापट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवड - येथे आज मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनि विविध विकास-कामांचे ई उद्घाटन केलं. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पंधरा मिनिटे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या आतच राहावं लागलं.
 
अन् मुख्यमंत्री सुखरूप बाहेर आले
पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ उदघाटन उरकलं. मात्र, पिंपरी चिंचवडमधील रिंग रोड बाधित शेकडो नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली हाती. याविषयी पोलिसांकडे याचना करण्यात आली परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडवले, याच दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहेर न पडू देण्याचा पवित्रा घेत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.तब्बल पंधरा मिनिटे हे नाट्य सुरू होते.नंतर आंदोलकामधील एकाला मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सोडले,मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यातही आले. परंतु मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रिंग रोड बाधितांनी गोंधळ घालत होते.मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी गर्दीमधून रस्ता काढत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला जागा करून दिली आणि मुख्यमंत्री सुखरूप बाहेर पडले.
 
पोलिस-आंदोलकांत झटापट
हे सर्व झाल्यानंतर गर्दीतील शेकडो आंदोलकांनी गोंधळ करत ठिय्या मांडला.यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तसेच मोठ्या संख्येने जमाव जमला.आंदोलकानी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ सुरू केला परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.या घटनेमुळे तब्बल तासभर तणावाचे वातावरण होते. तसेच पोलीस,छायाचित्रकार(पत्रकार),आंदोलकात झटापट झाली.
 
रिंग रोड प्रकरण नेमकं काय?
१९८७ सालचा रिंग रोडचा आराखडा पुन्हा चर्चेत आलाय. महापालिका हद्दीत ६५ टक्के तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत ३५ टक्के हा मार्ग विभागला गेलाय. मात्र या मार्गावर अनेक अनधिकृत बांधकामं उभारली गेलीत, त्यांना नोटिसा बजावत ती जमीनदोस्त करायला प्रशासनाने सुरुवात केलीये. यासाठी गेल्या दोन महिन्यापासून रिंग रोड बाधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना साकडं घालत आहेत.
बातम्या आणखी आहेत...