आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Crime News, Communal Amity, Family Life Take The Worst Hit

पुण्यात दोन गटात राडा: चाकू हल्ला अन् पोलिसांचा गोळीबार, नागरिकांमध्ये भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील पर्वती भागात मंगळवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाले. यात शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्हीही गट माघार घेत नसल्याने व राडेबाजी वाढत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला.

मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी पर्वतीतील स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. आज तेथे शांततेचे वातावरण असले तरी नागरिकांत मात्र भीतीचे वातावरण आहे. या राडेबाजीत मनसेचा एक स्थानिक पदाधिकारी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. पुणे शहर हे सुसंस्कृत म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही दिवसापासून शहराची शांतता नेमकी कोण भंग करू पाहत आहे असा सवाल पुणेकर नागरिक उपस्थित करीत आहेत.
पुण्यातील सिंहगड परिसरात 10-12 दिवसापूर्वी 90 वाहने जाळण्यात आली होती. त्यातील आरोपीला अटक केली असली तरी त्यामागचे नेमके कारण कळाले नाही. तसेच एखादी व्यक्ती परिसरातील सर्व वाहनांची तोडफोड व जाळून कशासाठी टाकेल हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. यामागे काही षडयंत्र तर नाही ना अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. गेल्यावर्षी हडपसर परिसरात अशाच झालेल्या धार्मिक हुल्लडबाजीत एका तरूणाचा प्राण गेला होता. तसेच एका वाहन चालकाच्या डोक्यात दगड घातला होता. तो वाहन चालकाला कायमचे अंपगत्व आले आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पुण्यात झालेल्या राडेबाजीला वेगळे वळण मिळू नये पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून याबाबत कोणतेही माहिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी काही स्थानिक नेत्यांची नावे पुढे आली आहेत. या सर्वांची पोलिस चौकशी करीत आहेत. आज दुपारनंतर यातील काहींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रकरण वाढू नये म्हणून यात हस्तक्षेप करून प्रकरण दाबले जाऊ शकते. एकूनच मागील काही दिवसात पुण्यातील हिंसक घटनांमुळे नागरिकांत भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे.
सिंहगड वाहन जळीतप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी-
सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायटींतील 28 जून रोजी पहाटेच्या सुमारास सुमारे 90 वाहने जाळल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अमन अब्दुल गनी शेख (32) यास मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी पोलिसांच्या विनंतीवरुन न्यायालयाने त्याला पुन्हा आठ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपी अमन शेख यास पाच जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाल्यानंतर जबाब नोंदवून त्याची कुटुंबासह चौकशी करण्यात आली.

आरोपीची ब्रेन मॅपिंग लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी त्याला परत कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयात पोलिसांनी केली. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत घटनास्थळावरील जळालेल्या वाहनांची राख, सीसीटीव्ही फुटेज, डी.व्ही.आर मधील हार्डडिस्क, आरोपीची टीव्हीएस स्कुटी आरोपीने गुन्हा करताना वापरलेले कपडे जप्त केले आहेत.