आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi And Ranbir Kapoor Buy Two Flats In Pune Trump Towers.

ऋषी-रणबीर कपूरने पुण्यात खरेदी केले दोन फ्लॅट, एकाची किंमत 13 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अभिनेता ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या पिता-पुत्रानी पुण्यातील कल्याणीनगरमधील ट्रम्प टावर्स या अलिशान अपार्टमेंटमध्ये 6100 स्क्वेयर फुटांपेक्षा जास्त एरियात दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका फ्लॅटची किंमत 13 कोटी रूपये आहे. हे 23 मजली दोन टावर्सचे अपार्टमेंट आहे व येथील प्रत्येक मजल्यावर केवळ एकच फ्लॅट असणार आहे. दोन्ही टावर्समध्ये फक्त 46 फ्लॅट्स असतील.
पंचशील ग्रुप बनवतोय हे टावर्स-
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प टावर्स अपार्टमेंटमध्ये कपूर पितापुत्रांनी हे डील 21,000 रुपये प्रति चौरस वर्ग फुट दराने केली आहे. पावर ऑफ अटॉर्नी याद्वारे दोन्ही अपार्टमेंट्सची रजिस्ट्री करण्यात आली आहे. ट्रम्प ब्रॅंडचा हा प्रोजेक्ट प्रसिद्ध बिल्डर ग्रुप पंचशील बनवित आहे. पंचशील ग्रुपने पुण्यात यापूर्वीही अनेक मोठे प्रोजेक्ट्स तयार केले आहेत.
ट्रम्प यांचा भारतातील पहिला प्रोजेक्ट-
ही प्रॉपर्टी न्यूयॉर्कमधील रियल एस्टेट टायकून डोनॉल्ड ट्रम्प यांची आहे. ट्रम्प यांचा हा भारतातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. डोनॉल्ड हे अमेरिकेतील पुढील वर्षी होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत आहेत. पुण्याशिवाय डोनॉल्डची कंपनी 'ट्रम्प ऑर्गेनायजेशन' ने मुंबईत लोढा ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. लोढा ग्रुप मध्य मुंबईतील वरळी भागात 75 मजली रहिवासी टावर्स उभा करीत आहे.

ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझानने खरेदी केला फ्लॅट-
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याची माजी पत्नी आणि इंटिरियर डेकोरेटर सुझान खानने पुण्यात सुमारे 16 कोटी रूपयांना एक पेंटा हाऊस खरेदी केला आहे. 2014 मध्ये ऋतिक रोशनने पुण्यातील रियल एस्टेट सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

काय आहे या खास प्रोजेक्ट मध्ये?
23 मजली या टावर्सचा बाहेरचा भाग संपूर्णपणे ग्लासचा राहणार आहे.
प्रत्येक मजल्यावर 6100 स्क्वेयर फुटाचा केवळ एकच फ्लॅट
आधुनिक फिटनेस सेंटर
आऊटडोर स्विमिंग पूल
बायोमेट्रिक कार्डनेच फक्त एंट्री
वर्ल्ड क्लास दर्जाचा स्पा
13,500 स्क्वेयर फुटाची आर्ट गॅलरी
वर्ल्डक्लास सिक्यूरिटी सिस्टम
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, या अपार्टमेंटमधील आतील नजरा कसा असेल..
.
(ही सर्व छायाचित्रे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतली आहेत. याद्वारे फ्लॅट व तेथील रचना कशी असेल हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. )