आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. के. यांचे कार्टून्‍स पाहून भडकल्‍या होत्‍या इंदिरा गांधी, लक्ष्‍मण यांना केले होते लक्ष्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'कॉमन मॅन'चा आवाज बुलंद करणारे ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार आर. के. लक्ष्‍मण यांचे सोमवारी सांयकाळी पुण्‍यात निधन झाले. मागच्‍या आठवड्यापासून पुण्‍यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्‍यांच्‍यावर उपचार चालू होते. सोमवारी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशात ओळख निर्माण झाली होती. कॉमन मॅनचे प्रश्‍न कार्टून्‍सच्‍या माध्‍यमातून शासनापर्यंत पोहचवणे हा त्‍यांच्‍या कार्टून्‍सचा विषय असायचा. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका पार पाडली. सर्वसामान्‍यांचे प्रश्‍न सोडवण्‍यासाठी ते नेतृत्‍वस्‍थानी असलेल्‍या व्‍यक्तिंना टारगेट केले. मात्र खालच्‍या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही.
'टाइम्स ऑफ़ इंडिया' मधील त्‍यांची कार्टून्‍स हा सर्वांच्‍या चर्चेचा विषय असायचा. आणीबाणीच्या काळात त्‍यांच्‍या इंदिरा गांधी यांच्‍यावर ' इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा' अशा प्रकारचे कार्टून्‍स तयार केल्‍यामुळे इंदिरा गांधी त्‍यांच्‍यावर भडकल्‍या होत्‍या. अशा प्रकारचे कार्टून्‍स यानंतर बनवायचे नाही अशा प्रकारचा सल्ला इंदिराजीने आर. के. यांना दिला. त्‍यावेळी आर. के. यांनी इंदिरा गांधी यांना प्रतिउत्तर दिल्‍यामुळे काही काळा त्रास सहन करावा लागला होता. अणीबाणीच्‍या काळात त्‍यांनी देश सोडला आणि काही दिवसांसाठी ते मॉरिशसला स्‍थायीक झाले होते.

पुढील स्‍लाईडवर पाहा आर. के. यांची आणीबाणीच्या काळातील आणि इरत कार्टून्‍स...