आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्यावरून कार नदीत कोसळल्याने चौघांचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथील भीमा नदीच्या बंधाऱ्यावरून कार नदीत कोसळून चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नंदा दीपक गायकवाड (२७), प्रतिभा नवनाथ पवार (२६), नवनाथ हरिभाऊ पवार (३०), अाबा प्रल्हाद जठार (२५, सर्व रा. सादलगाव, ता. शिरूर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. 

शुक्रवारी दुपारी सर्व जण कारने नांदगाववरून मांडवगण-फराटाकडे जात हाेते. त्या वेळी भीमा नदीवरील बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीत  कोसळली. यात चौघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर  क्रेनच्या साहाय्याने नदीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...