आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्याजवळ कार- ट्रेलरचा अपघात, कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ काल मध्यरात्रीच्‍या सुमारास कार व ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेला भरधाव वेगात निघालेली एक सँट्रो कार पाठीमागून एका ट्रेलरच्या खाली घुसली. या अपघातात राजेंद्र विष्णु चव्हाण, वनिता चव्हाण, शंकार वनघुले व पूजा वनघूले यांचा जागीच मृत्यू झाला.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली सॅट्रो कार क्र. (एमएच 04 बी डब्लू 0229) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच 06 एक्यु 7517) ला मागून जोरात धडकली. ही धडक प्रचंड भीषण होती. सॅट्रो गाडी कंटेनरच्या खाली घुसली आणि त्यामुळे आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
पुढे पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...