आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - चालकाचा ताबा सुटला, चिंचवड स्टेशनजवळ विचित्र अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चिंचवड स्टेशन येथे एका विचीत्र अपघात घडला आहे. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरील तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाल्‍याची माहिती मिळाली.
चिंचवड स्टेशनजवळ असलेल्‍या जैन मंदिरासमोर निगडीहून पुण्याकडे एक बोलेरो येत होती. बोलेरोच्‍या चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले नि त्‍याने थेट समोर असलेल्‍या तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात बोलेरो वाहनातील चौघे व कायनेटीक गाडीवरील एकजण जखमी झाला आहे. या सर्वांना जवळील खाजगी हॉस्‍पिटलमध्‍ये उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी गर्दी केली होती. त्‍यामुळे काही काळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतुक पोलिसांनी लवकरच घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली त्‍यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, राज्‍यातील इतर काही घटना..