आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सराईत गुन्हेगाराला अटक, 41 तोळे सोने, दुचाकी व 50 हजार रोख जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडसह परिसरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. धनंजय बबन मुने असे आरोपीचे नाव असून तो तडीपार गुंड आहे. त्याच्याविरोधात एकूण 32 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून तब्बल 41 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

 

सूत्रांनुसार, धनंजय मुने वय (21, रा.सुतारदरा) या सराईत आरोपीने 10 दिवसांपूर्वी निगडी परिसरात उघड्या दरवाज्या वाटे चोरी केली होती. निगडी पोलिस त्याच्या मागावर होते. रावेत येथे आरोपी धनंजय येणार असल्याची मा‍हिती लागली असता, निगडी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हे कबूल केले. यात त्याने एकूण 13 लाख 57 हजार रुपयांच्या घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यात 41 तोळे सोने, 1 दुचाकी आणि रोख 50 हजार रुपये समावेश आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाययक पोलिस आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पळसुले, पोलिस निरीक्षक शंकर औताडे, सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर यांनी केली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...