आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोळयात मिरची पूड टाकून लुटमारी करणारी टोळी जेरबंद; 1 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्या डोळयात मिरची पूड टाकून लुटमारी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीस अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास यश आले आहे. सदर आरोपींच्या ताब्यातून दोन मोटारसायकल, 72 हजार रुपये किंमतीचे रिचार्ज व्हाऊचर व रोकड असा एक लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली आहे.

         
याप्रकरणी प्रदीप आदिनाथ गायकवाड (वय-29,रा. इंदिरानगर, पुणे), योगेश जालींदर आल्हाट (29,रा. सिंहगड राेड,पुणे), सुरज अशोक महस्के (23,मु.रा.सावरगांव, उस्मानाबाद), अक्षय राम गायकवाड (22,रा.दांडेकर पुल,पुणे), अानंद कदम (19, मु.रा.सोलापुर), करण अंकुण जाणराव (19, रा.पुणे)अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. सदर अाराेपींनी चार दिवसांपुर्वी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार पेठ येथे एका दुकानात माेबार्इलचे व्हाऊचर घेण्याचे बहाण्याने दुकानात जावुन, व्यवसायिकाच्या डाेळयात मिरची पुड टाकुन त्याच्यावर काेयत्याने वार करुन लुटमारी केली हाेती. गुन्हे शाखा युनिट एकचे पाेलीस नार्इक तुषार खडके व पाेलीस हवालदार रिजवान जिनेडी यांना मिळालेल्या माहितीच्या अाधारे पाेलीस निरीक्षक नितीन भाेसले यांचे पथकाने सदर अाराेपींना अटक केली अाहे.

 

घरफाेडी करणाऱ्या दाेन बांग्लादेशींना अटक
पुणे शहरात वेगवेगळया ठिकाणी घरफाेडी करणाऱ्या दाेन बांग्लादेशी व्यक्तींना गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने अटक केली अाहे. इदानूर रहेमान राकिब (वय-62) व जाकिर काेबिद हुसेन (42,दाेघे मु.रा.बांग्लादेश) अशी अटक अाराेपींची नावे अाहेत. त्यांच्या ताब्यातून चार घरफाेडीच्या गुन्हयातील 337 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने व 600 ग्रॅम चांदी असा एकुण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे. सदरचे अाराेपी सरार्इत घरफाेडी गुन्हेगार असून त्यांना सन 2015 मध्ये चंदननगर  पाेलीसांनी सात गुन्हयात अटक केली हाेती. जून 2017 मध्ये जामीनावर सुटल्यानंतर त्यांना काेंढवा येथे पुन्हा घरफाेडी करताना पकडण्यात अाले हाेते. नाेव्हेंबर महिन्यात दाेघे पुन्हा जामीनावर सुटल्यावर त्यांनी कात्रज भागात घरफाेडी सुरु केली हाेती. अाराेपी इदानूर राकिब हा विना व्हिसा भारतात अालेला असून त्याला पाेलीसांनी अाठवडयापुर्वी त्याची मायदेशी रवानगी केल्यानंतर, ताे पुन्हा पुण्यात येऊन घरफाेडी करत हाेता. तर अाराेपी जाकिर हुसेन हा प्रवासी व्हिसावर एक महिन्याकरिता भारतात अाला असून व्हिसा मुदतीनंतर  घरफाेडी करताना मिळून अाल्याचे पाेलीस निरीक्षक सतिश निकम यांनी सांगितले अाहे.

 

नगरचा सोनसाखळी चोर अटकेत
गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाताील पाेलीस नार्इक अंकुश जाेगदंडे यांना माहिती मिळाली हाेती की, मांजरी रस्त्यावर साेनसाखळी चाेरी करणारा श्रीरामपुर भागातील अाराेपी कंबर इराणी संशयितरित्या पल्सर माेटारसायकलवर फिरत अाहे. त्यानुसार पाेलीसांनी सापळा रचून कंबर ऊर्फ डंपर शहाजान जाफरी इराणी (वय-32,मु.रा.श्रीरामपूर, अहमदनगर) या अाराेपीस अटक केली अाहे. त्याच्या ताब्यातून  साेनसाखळी चाेरी व पाेलीस बतावणी करुन लुटमारीच्या चार गुन्हयातील एक लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला असल्याचे पाेलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले अाहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...