आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक फोडून चोरट्यांनी लांबवली 65 लाखांची रोकड; CCTVतील सीडीही नेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील दाैंड तालुक्यातील राहू गावातील पुणे जिल्हा मध्ययवर्ती सहकारी बँक फोडून चाेरट्यांनी ६५ लाख रुपयांची राेकड लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

दरम्यान, घटनेचे चित्रीकरण होऊ नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सीडीही चोरून नेली. त्यामुळे पोलिसांना तपासकामात अडथळा निर्माण होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची राहू गावात शाखा असून यापूर्वीही चोरट्यांनी ही बँक फाेडण्याचा दाेनदा प्रयत्न केला हाेता.

शनिवारी पहाटे चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजाेरीतील ६५ लाख रुपये लंपास केले. चाेरीचे चित्रीकरण होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी चलाखीने दुसरीकडे वळवला. तसेच चाेरी करून जात असताना कॅमेऱ्यातील सीडीही त्यांनी सोबत नेली. त्यामुळे पाेलिसांना तपासकामात अडथळे निर्माण झाले अाहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
बातम्या आणखी आहेत...