आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:चाकणमध्ये ICICI बॅंकेचे 2 एटीएम फोडले; 39 लाख रुपयांवर चोरट्यांनी मारला डल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चाकण येथील महाळगे-इंगळे चौकातील आयसीआयसीआय बॅंकेचे दोन एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी त‍ब्बल 39 लाख 59 हजार रुपये लंपास केले आहेत. ही घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरटे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

एटीएमची सुरक्षा राम भरोसे...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकणमधील म्हाळगे इंगळे चौकातील आयसीआयसीआय बँकेचे दोन एटीएम फोडल्याची घटना आज (गुरुवारी) सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली.तब्बल 39 लाख 59 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. धक्कादायक म्हणजे एटीएमची सुरक्षा राम भरोसे होती. या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नसल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले आहे. याचाच फायदा  घेत चोरांनी मध्यरात्री गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडले.

चोरटे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...