आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery In Pune At Manacha Sharada Ganapati Mandir

पुण्यात मानाचा शारदा गणपतीच्या मंदिरातून 50 लाखांचे दागिने लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा गणपती मंदिरात आज पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात एका चोरट्याने प्रवेश करीत मंदिरातील 50 तोळ्यांचे दागिने लुटले आहेत. याचबरोबर एक महागडा हि-याचा नेकलेस लुटून नेला आहे. या सर्व दागिन्यांची किंमत अंदाजे 50 ते 55 लाख रूपये आहे.
पुण्यातील मध्यवस्तीत मंडई येथे मानाच्या शारदा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेराही आहे. आज पहाटे पाच वाजून पाच मिनिटे झाली असताना एक चोरटा मंदिरात प्रवेश करताना सीसीटीव्हीत आढळून आला आहे. यावेळी चोरट्याने मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 50 तोळ्यांपेक्षा अधिक वजनाचे दागिने, हि-याचा महागडा नेकलेस चोरून नेला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पुण्यातील अखिल मंडई शारदा गजानन गपणती मंडळाचे ट्रस्टी नाना थोरात यांनी सांगितले की, मंदिरातील व मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटा कैद झाला आहे. तो चोरटा नेमका कोण आहे हे आम्हाला ट्रेस झाला आहे. पोलिस त्याला लवकरच अट करतील व आमच्या मंदिरातील सर्व दागिने पळत मिळतील.
पुढे पाहा, सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा...