आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात डोक्यात दगड घालून भरदिवसा चोरट्यांनी 3 लाखांची रोकड लांबवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बँकेत पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या ऑफिस बॉयच्या डोक्यात दगड घालून सव्वा तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर परिसरातील एसबीआय बँकेच्या दारातच हा प्रकार सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. 

 

उमेश शिवाजी कदम (वय ३०, रा. संतोष सावता माळी मंदाराजवळ, भुजबळ चौक, वाकड) असे या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्यांने दिलेल्या फिर्यादीनुसार, चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हा सुर्या हॉस्पिटल येथे ऑफिस बॉय म्हणून नोकरी करतो. त्‍याच्‍याकडे शनिवारी सकाळी हॉस्पिटलची ३ लाख २३ हजाराची रोकड एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी आणि एसबीआय बँकेच्या शाखेत चेक भरण्यासाठी देण्यात आला होता. चेक आणि रोकड घेऊन तो दुचाकीने सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास बाणेर एसबीआयच्या शाखेत आला. त्याचवेळी पल्सर दुचाकीवर आलेल्या तिघांनी अचानक पाठिमागून येऊन त्याला पकडले. दोघांनी त्याला तेथील अरिया टॉवर्सच्या गल्लीत नेले. त्याठिकाणी खाली पाडून त्याला हाताने मारहाण केली. त्याचेळी त्यातील तिसर्‍याने त्याच्या डोक्यात जवळ पडलेला दगड डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तिघेही त्याच्याकडील सव्वा तीन लाख रुपयांची रोकड असणारी बॅग घेऊन पसार झाले. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान याघटनेची माहिती वार्‍या सारखी परिसरात पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. भरदिवसा अन वर्दळीच्या ठिकाणीच दगड घालून लुटण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी अधिक तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...