आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यामध्ये भरदिवसा आयटीतील अभियंत्यांची 18 घरे फोडली, चोरट्यांनी लांबवले 85 तोळे सोने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आयटी इंजिनिअर्स राहत असलेल्या पुण्यातील वाकड येथील आइसलँड, कासापल्ली व मॅग्झिमा या वसाहतीत भरदिवसा एकापाठोपाठ 18 घरफोड्या झाल्या. यात 85 तोळे सोन्यासह 50 हजारांची लूट झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी शिवप्रसाद मारुतराव केंचे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसाहतीतील रहिवासी हिंजवडी येथील कंपनीत गेल्याचे हेरून चोरट्यांनी मंगळवारी कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. 18 घरांतील तिजोर्‍यांत ठेवलेला ऐवज त्यांनी लंपास केला. तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. मात्र, चांदीचे दागिने व इतर किमती वस्तूंना त्यांनी हात लावलेला नाही हे विशेष.
पुढे वाचा, 15 सुरक्षा रक्षक, तरी घरफोड्या...