आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: खडकीत गोडाऊन फोडून एक कोटी रूपयांचे सिगारेट बॉक्स लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील खडकी भागात एका गोडाऊनचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी एक कोटी रूपयांची सिगारेटच्या बॉक्सची चोरी करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी पहाटे घडली असून, खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अशोक गोयल (53) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, अशोक गोयल यांचा होलसेल सिगारेट विक्रीचा व्यवसाय आहे. विविध ब्रॅंन्डेड कंपन्यांचे सिगारेट बॉक्स गोयल आपल्या खडकीतील युनिक सेल नावाच्या गोडाऊनमध्ये ठेवत असतात. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांचे गोडाऊनचे शटर तोडून गोडाऊनमध्ये असलेल्या सुमारे 1 कोटी रूपयांचे विविध ब्रॅन्डेड कंपन्यांचे सिगारेट बॉक्स चोरून नेले. खडकी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...