आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे : जेवणाना झाले भांडण, दोघांनी रुममेटचा लोखंडी व्हीलने केला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील कर्वेनगर परिसरातील मिलेनियम शाळेजवळ असलेल्‍या एम. पी. ग्रुप कंपनीच्‍या खोलीत राहणाऱ्या एका तरुणाचा त्‍याच्‍याच दोन रुममेटने डोक्‍यात लोखंड व्‍हीलने वार करून खून केला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. सुधीर उर्फ सागर विलास जाधव (वय 27, रा. सातारा) असे मृताचे नाव आहे. धनाजी गोपाल वतने (वय 54, रा. निलंगा, लातूर) आणि सचिन रांजिव पाटे (वय 31, रा. कर्वेनगर, रा. निलंगा, लातूर) अशी आरोपींची नावे असून, त्‍यांना पोलिसांनी अटक केली.
नेमके काय आहे प्रकरण ?
> रामचंद्र बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पोलिसांना दिलेल्‍या माहितीनुसार, मृत सुधीर हा आणि आरोपी एम. पी. ग्रुप कंपनीमध्‍ये कामाला होते.
> सुधीर आणि त्‍यांच्‍यात रविवारी रात्री जेवणाताना वाद झाला.
> सुधीरने त्‍यांना शिविगाळ केली.
> त्‍या रागातून त्‍यांनी त्‍याच्‍या डोक्‍यात लोखंडी व्‍हील घालून त्‍याचा खून केला.
> पोलिसांनी दोन्‍ही आरोपीला अटक केली.
बातम्या आणखी आहेत...