आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Agitation In Indapur Against CM Prithviraj Chavan

रिपाइं कार्यकर्त्यांनी इंदापुरात दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी विजय कांबळे या दलित अधिकार्‍याला डावलले, इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यास चालढकल आदींच्या निषेधार्थ रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या. निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शुक्रवारी आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून त्यांच्या भाषणात अडथळे निर्माण केले. या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.