आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RPI Give Election Caditure To Kalmadi From Pune Athwale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश कलमाडींना \'रिपाइं\'तर्फे उमेदवारी देऊ, रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘सुरेश कलमाडी चांगले उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत आम्ही कॉँग्रेस आघाडीबरोबर असताना कलमाडी आमच्याच मतांवर निवडून आले होते. आम्हाला त्यांच्याबद्दल अडचण नाही. महायुतीत चर्चा करुन त्यांना पुण्यातून ‘रिपाइं’तर्फे उमेदवारी देऊ’, असे खळबळजनक वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी केले.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागावाटपात पुण्याची जागा रिपाइंला मिळावी, हा प्रयत्न असल्याचे आठवले यांनी सांगितले. यावर तुमचा उमेदवार कोण, अशी विचारणा केली असता त्यांनी कलमाडींचे नाव घेतले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यातील आरोपी असल्याने कॉँग्रेसने पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना पक्षातून निलंबित केले आहे. ‘महायुतीतल्या इतर नेत्यांशी चर्चा करुन कलमाडींना निमंत्रण देऊ,’ असे आठवले यांनी सांगितले.

मला सगळीकडून मागणी
‘मी कुठून लोकसभा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मला सगळीकडूनच मागणी आहे. येत्या लोकसभेत रिपब्लिकन पक्षातर्फे चार-पाच जागा लढवण्याचा आमचा विचार आहे. यादृष्टीने शिवसेना आणि भाजपने लवकरात लवकर जागा वाटपाचा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे आम्हाला कामाला लागता येईल,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केली.

‘अ‍ॅट्रॉसिटी’त बदल हवा
अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. मात्र या समितीने काहीही केलेले नाही. दलितांच्या संरक्षणासाठी सुधारित कायद्याची गरज आहे. या कायद्याचा दुरुपयोग करुन सवर्णांवर चुकीचे खटले दाखल करण्याला मात्र आमचा पाठिंबा नाही,’ असे आठवले म्हणाले.