आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief DR. Mohan Bhagwat Commented On Reservation In Pune

आरक्षण राबवण्याची पद्धत प्रामाणिक हवी; सरसंघचालक मोहन भागवत यांची अपेक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘भारतीय संविधानाने काेणालाही न नाकारता समाजातील सर्वांनाच सामावून घेतले अाहे. तसेच सर्वसंमतीनेच संविधान बनवले असून त्यात सर्वसंमतीनेच बदल करण्याची व्यवस्थाही करण्यात अालेली अाहे. तसेच देशात जाेपर्यंत सामाजिक भेदभावाचे वातावरण अाहे ताेपर्यंत अारक्षण कायम ठेवणे अावश्यक अाहे,’ असे स्पष्टीकरण देताना ‘ संविधान व अारक्षणाची अंमलबजावणी मात्र प्रामाणिकपणे करायला हवी,’ अशी अपेक्षा सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केली.

पुण्यात माईर्स एमअायटीच्या वतीने अायाेजित सहाव्या भारतीय छात्र संसदेत ते ‘संस्कृती, संविधान माध्यमातून राष्ट्रीय एकता’ या विषयावर बाेलत हाेते. जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.विजय भटकर, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू संजय देशमुख, एमअायटीचे संस्थापक डाॅ.विश्वनाथ कराड, राहुल कराड अादी उपस्थित हाेते.

भागवत म्हणाले, ‘समाजाच्या पिढ्या बदलल्या तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. स्वभावानुसार अापले उत्तर नेहमी असावे. बंधुभाव, धर्म ही अापली संस्कृती असून विविधतेत एकता अापण साधलेली अाहे. पाच हजार वर्षांपासूनची संस्कृती अापला अाधार अाहे. अापल्या देशाच्या संविधानात १९७६ साली जरी ‘धर्मनिरपेक्ष व समाजवादी’ शब्द जरी जाेडण्यात अाले असले तरी त्यापूर्वीच संविधान निर्मात्यांचा ताे स्वभाव हाेता. संविधानाचा अर्थ काेणाला वाटेल तसा लावणे प्रामाणिकपणाचे नाहीच.’

पाकिस्तानचे संविधान हे सर्वांना समान अधिकार देणारे असावे, असे महंमद जीनांना अपेक्षित हाेते. मात्र, अाता ते एका संप्रदायावर अाधारावर बनलेले असून त्या देशाकडे सहिष्णुता, समावेशकता दिसत नाही. भारतीय संस्कृतीने सर्वांना मात्र अापल्या सर्वांना एकत्रित बांधलेले असून भारतीय संस्कृतीच अापल्या संविधानाचा अात्मा अाहे, असे डाॅ. भागवत म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाले भागवत...
-राममंदिर भूक भागवू शकेल का... यावर काय म्हणाले भागवत...