आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यम शिवम् सुंदरम ही आपल्या देशाची संस्कृती- मोहन भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आज हिंजवडीजवळील मारुंजी- नेरे- जांबे या तीन गावांच्या सीमेवर होत असलेल्या 'शिवशक्ती संगम' कार्यक्रमाला लाखो स्वयंसेवक सकाळपासून कार्यक्रमस्थळी दाखल होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व सरसंघचालक मोहन भागवत व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे, गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना भागवत काय म्हणाले?..
- आपल्या शत्रूंच्या छातीवर पाय ठेवून इस्रायल उभा आहे तो शक्तिशाली समजामुळे- मोहन भागवत
- धर्म म्हणजे सगळ्यांना जोडून ठेवतो, त्यांना खाली पडू देत नाही. उलट त्यांची उन्नती करतो - मोहन भागवत
- मोठे मोठे राजे सुद्धा शील संपन्न साधुंपुढे नम्र होतात असा आपला देश आहे. शक्ती शीलयुक्त असली पाहिजे - मोहनजी भागवत
- दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींही विचारात घेतल्या जात नाहीत- मोहन भागवत
- भारतीय संस्कृतिची आज जगात सर्वदूर चर्चा आहे. - मोहन भागवत
- संघ व्यक्तीनिष्ठ नाही तर तत्वनिष्ठ आहे - मोहन भागवत
- संपूर्ण भारताचा विचार करून आपल्या भागात काय केल पाहिजे ते करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - मोहन भागवत
कार्यक्रम भव्यदिव्य...
सकाळपासूनच स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी दाखल होत होते. दुपारी 1 पर्यंत एक लाखांहून अधिक स्वयंसेवक हजर झाले होते. या सर्वांची दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सात जिल्ह्यांतील एक लाख 60 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. तसेच सामान्य नागरिकांनाही हा कार्यक्रम खुला असल्याने हा आकडा दोन लाखांहून अधिक असेल अशी माहिती संघाच्या कार्यकर्त्यांनी दिली. पुण्यात अनेक वर्षानंतर म्हणजे 1983 नंतर शिवशक्ती संगमचा मेळा भरत असल्याने हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यात आला.
संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातून स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. मारुंजी येथे साडेचारशे एकरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास 80 बाय 200 आकाराचे भव्य तीन मजली व्यासपीठाची उभारणी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. प्रदर्शनी, घोष प्रात्यक्षिक, एक लाख स्वयंसेवकांचे सांघिक पद्य व सरसंघचालकांचे भाषण असा केवळ दोन तासांचा हा कार्यक्रम असेल. आज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मुख्य कार्यक्रम होईल. कोल्हापूर, सोलापूर, नाशिकहून स्वयंसेवकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक आज सकाळपासून संघस्थानी दाखल होत आहेत.
व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मेघडंबरीतील पुतळा बसवण्यात आला असून रायगडवरील राजदरबार व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. तसेच 70 फूट उंचीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी तटबंदी करण्यात आली असून 16 किल्ल्यांच्या प्रतिकृतींची 16 मोठी प्रवेशद्वारे तयार केली आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी 45 सिद्धता केंद्र तसेच 150 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थिती लावणार असून त्यासाठी सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच वाहतूक सुरळित राहावी यासाठी वाहतूक विभागाने तयारी केली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शिवशक्ती संगमच्या तयारीचे....
बातम्या आणखी आहेत...