आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rto Offices Closed In All Over India, Nitin Gadkari Gives Hints In Pune

\'RTO\' कार्यालये बंद करण्याचे गडकरींचे संकेत, ट्रॅफिक पोलिसही होणार हद्दपार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- पुणे विभागीय वाहतूक कार्यालय)
पुणे- देशभरातील आरटीओ कार्यालये ही भ्रष्टाचाराची कुरणे बनली असून, तेथे फक्त लक्ष्मी दर्शनाचाच खेळ चालतो. अशी कालबाह्य झालेल्या यत्रंणा येत्या काही काळात बंद करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या ज. स. करंदीकर व्याख्यानमालेत गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा येत्या काही काळातील विकासाच्या प्राधान्याचा रोडमॅप सादर केला.
गडकरी म्हणाले, देशभरातील विभागीय वाहतूक कार्यलये म्हणजे आरटीओ कार्यालये कालबाह्य झाली आहेत. इंग्रजांच्या काळातील अनेक प्रथा व कायदे आजही आपल्याकडे राबविले जातात. आरटीओ कार्यालये हे त्याचेच आदर्श उदाहरण. आरटीओमध्ये नागरिकांची कोणतेही काम होत नाही. सगळीकडे दलालांचा विळखा पडलेला आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी पैसे घेतले जातात. आता या खात्याची अधिक उपयुक्तता राहिली नाही. त्यामुळे देश पातळीवर रस्ते वाहतूक मंत्रालय यासाठी काही पर्यायी व्यवस्था उभी करू पाहत आहे, असे गडकरींनी सांगत आरटीओ पद्धत बंद करण्याचे संकेत दिले. मात्र, आरटीओऐवजी नवी यत्रंणा कशी असेल याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
...तर ट्रॅफिक पोलिसही होणार हद्दपार आणि
वर्षभरात अर्थव्यवस्था रूळावर आणणार... वाचा गडकरी आणखी काय-काय म्हणाले...