आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RTO Rule Strictly Folllow In Pune, But Middle Men Come Together

पुण्यात ‘मोकळा श्वास’, बंदीविरोधात दलाल एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - परिवहन आयुक्तांच्या आदेशाची सोमवारी पुणे आरटीओ कार्यालयात अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या या कार्यालयात सोमवारी शुकशुकाट जाणवत होता. कार्यालयात दलालांना बंदी घालण्यात आली असून, यापुढे दलाल काम करताना दिसल्यास पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. वाहन परवाना काढण्याची प्रक्रिया सोपी असून त्यासाठी दलालांची गरज पडत नाही. कार्यालयात थेट येणा-या लोकांची कामे तातडीने करण्याच्या सूचना कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधींचे ओळखपत्र तपासले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या पुणे आरटीओ कार्यालयात सुमारे २४० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून ६० पदे रिक्त आहेत.

दरम्यान, काम बंद असले तरी सुमारे शंभरावर दलाल सोमवारी आरटीओ कार्यालय परिसरातच होते. आयुक्तांच्या बंदी आदेशाविरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा निर्णय त्यांनी एका बैठकीत घेतला. ‘आम्हाला दलाल म्हणून नव्हे तर प्रतिनिधी म्हणून नागरिकांची कामे करण्याचा हक्क द्यावा,’ अशी मागणीही त्यांनी केली.

अधिकारपत्राचे कवच
नागपूर खंडपीठाने १९८७ मध्ये आरटीओ कार्यालयातील दलाली रद्द करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्याला दलालांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हा कार्यालय आवारात येणा-या कोणत्या व्यक्तींना दलाल म्हणायचे अशी विचारणा न्यायालयाने केली होती. वाहन मालकाकडून अधिकारपत्र आणल्यास आरटीओ कार्यालयात जाऊन कोणतीही व्यक्ती ते काम करू शकते, असे नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यामुळे हे दलाल अधिकृत की अनधिकृत? असा पेच निर्माण झालेला आहे.