आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruling Party Confuse Their Stand, Ajit Pawar Said

विरोधात असल्याचे अजूनही वळत नाही, दादांची सत्ताधाऱ्यांवर मिश्कील टिप्पणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - युतीचे सरकार १५ वर्षांनी सत्तेत अाल्याने त्यांना सत्तेची जाण नाही, तर अाम्ही विराेधात अाल्याचे अजून आमच्यापैकी काही जणांना वळत नसल्याने गाेंधळ उडत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्कीलपणे बोलताना शनिवारी पुण्यात सांगितले.पवार म्हणाले, भाजपचे सरकार पूर्ण बहुमतात आलेले नाही. त्यांचा सहकारी पक्ष सेना "सर्वत्र भ्रष्टाचार' दिसत असल्याचे सांगत आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात वेगवेगळी वक्तव्ये छापून येत असल्याने ते सत्तेत फारसे समाधानी दिसत नाहीत. दाेन्ही पक्षांत किती सख्य अाहे हे यावरून दिसते. उद्धव ठाकरे यांनी जर आक्रमक भावनेतून निर्णय घेतला तर ताे या सरकारचा शेवटचा दिवस ठरेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघास भेट देऊन त्यांनी पत्रकारांच्या ‘कृतज्ञता गाैरव समारंभ कार्यक्रमात हजेरी लावली याप्रसंगी ते बाेलत हाेते. या वेळी खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापाैर दत्तात्र्य धनकवडे, माजी अामदार जयदेव गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस याेगिराज प्रभुणे व्यासीपठावर उपस्थित हाेते.

पवार म्हणाले, अाघाडी सरकारच्या काळात विराेधी पक्षांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या अात्महत्येप्रकरणी अाम्हाला दाेषी ठरवले. शेतकऱ्यांच्या अात्महत्या हाेऊ नयेत, असे अामचे मत अाहे. मात्र, भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या अात्महत्येत वाढ झाली असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याची चिन्हे दिसत आहेत.

अामचे सरकार पायउतार होण्यासाठी विराेधकांनी अामच्या विराेधात भ्रष्टाचाराचे अाराेप करून लाेकांत गैरसमज पसरवला. मात्र, अाता केंद्र व राज्यात भाजपचे सरकार अाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समाेर येत अाहेत. भाजपचे त्यांच्या मित्रपक्षांशी सुरुवातीपासूनच मतभेद आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार १५ वर्ष सत्तेस असताना अशा प्रकारे मतभेद कधी पुढे अाले नाहीत, तेवढे आता पाहायला मिळत आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

अधिवेशनात सरकारची काेंडी करणार
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन साेमवारपासून सुरू हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते रविवारी बैठक घेऊन अधिवेशन काळात काेणते प्रश्न प्रामुख्याने मांडायचे याबाबत धाेरण ठरवणार अाहेत. या वेळी सरकारला जाब विचारला जाईल. पावसाने अाेढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमाेर अाहे. गारपीट,अवकाळी पाऊस, दुष्काळ निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अाश्वसनांची खैरात करून भाजप सत्तेत अाल्यानंतर अच्छे दिन न अाल्याने शेतकरी असमाधानी अाहे. जिल्हा बँका-सरकारमध्ये समन्वय नाही, कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अाहे अादी विषयांबाबत शासनाला विचारणा केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी या वेळी दिली.