आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • S T Driver Santosh Mane Mental Patient;solapur Doctor

एसटी चालक संतोष माने मानसिक रुग्ण ;सोलापूरच्या डॉक्टरांची पुणे न्यायालयात साक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यात बेदरकारपणे बस चालवून 9 निष्पापांचे बळी घेणारा एसटी चालक संतोष मानेला ‘मॅनिया’ आजार असून आपण त्याच्यावर उपचार करत होतो. यादरम्यान त्याला सहा वेळा इलेक्ट्रो कॉनव्हलसीज थेरपी दिली असल्याची साक्ष सोलापूर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डॉ. बुरटे म्हणाले, संतोषचा भाऊ 19 फेब्रुवारी 2010 रोजी त्याला उपचारासाठी घेऊन आला होता. झोप न येणे, कमी खाणे, कानात विविध आवाज येणे, संशयी कल्पना येणे, नैराश्य, आत्महत्या करण्याच्या कल्पना येणे असे प्रकार होत असल्याचे संतोषने सांगितले होते. तपासणीवरून त्याला ‘मॅनिया’ झाल्याचे समजले व त्यानुसार मी त्याला औषधे दिली. तपासणीत तो चिडखोर, बेचैन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची स्मरणशक्ती व बुद्धी मात्र स्थिर होती. नंतरच्या काळात तो 7- 8 वेळा रुग्णालयात आला होता. अपघाताच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी माझा जबाब नोंदवला होता, असे डॉ. बुरटे म्हणाले.

अहवाल वेगळाच
अपघातानंतर येरवडा मनोरुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या निरीक्षणात मात्र संतोष मानेची मानसिक स्थिती चांगली असल्याचे आढळून आले असून, याबाबतचा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 मार्च रोजी होईल, त्यात सरकारी वकील डॉ. बुरटे यांची उलट तपासणी करतील.