आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या आत्मचरित्राची मराठी आवृत्तीही निघणार, २० हजार प्रतींची पहिली आवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - क्रिकेटविश्वातला‘विक्रमादित्य’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता एका वेगळ्या विश्वातलाही ‘विक्रमवीर’ ठरणार, अशी चिन्हे आहेत. सचिनने लिहिलेले ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र मराठीत येत आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रारंभीच तब्बल २० हजार प्रतींची आवृत्ती घेऊन प्रकाशित होत आहे. मराठी साहित्यविश्वात नजीकच्या काळात ‘हिंदू’चा अपवाद वगळता (१० हजार प्रती) कुठल्याच पुस्तकाची पहिली आवृत्ती इतक्या प्रतींची निघालेली नाही. त्यामुळे आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाबाबत वाचकांमध्ये उत्सुकता आहे.

या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशनाचे हक्क पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मिळवले आहेत. मराठी अनुवाद दीपक कुळकर्णी यांनी केला आहे. सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच मुखपृष्ठाने अनावरण करण्यात आले. प्रकाशक सुनील मेहता म्हणाले, ‘मराठी आवृत्तीचे प्रकाशन सचिनच्या उपस्थितीत ३० मे रोजी पुण्यात होणार आहे. या वेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री, अनिल कुंबळे तसेच क्रीडा समीक्षक हर्ष भोगले उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील प्रकाशन समारंभानंतर जून महिन्यात मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथेही प्रकाशन समारंभ होणार आहेत.’

सचिनची स्वाक्षरी
पुण्यातीलप्रकाशन समारंभात पहिल्या दोन हजार प्रतींवर स्वत: सचिन स्वाक्षरी करणार आहे. त्यासाठी पुस्तकाची पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. २० मेपर्यंत वाचक पूर्वनोंदणी करू शकतात.

प्रतींचा विक्रम
कुठल्याहीमराठी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसाठी २० हजार प्रती हा एक विक्रम ठरण्याची शक्यता आहे. कुठलाच प्रकाशक प्रतींची नेमकी आकडेवारी जाहीर करत नसताे. या पार्श्वभूमीवर सुनील मेहता यांनी मात्र प्रतींची संख्या जाहीर केली आहे. ‘यापूर्वी आम्ही रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ (४० हजार प्रती) आणि ‘श्रीमान योगी’ (२२ हजार प्रती) अशा आवृत्या काढल्या आहेत. पण त्या पहिल्या आवृत्या नव्हत्या. सचिनच्या पुस्तकाविषयीची उत्सुकता लक्षात घेऊनच पहिली आवृत्ती २० हजार प्रतींची काढण्याचा निर्णय घेतला,’ असे मेहता म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...