आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचा एक फैन असाही..पिंपरी चिंचवडमध्ये बाबा भोईरने बुक केला अख्खा शो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- सचिन तेंडुलकरचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाताना चाहते ज्या तयारीने जात होते, अगदी तशीच तयारी करून त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये सचिन तेंडुलकरचा एक जबरा चाहता समोर आला आहे तो म्हणजे बाबा भोईर. या सचिन वेड्या चाहत्यासह त्याच्या मित्र मंडळीने हातात राष्ट्रध्वज, गालावर पेंट केलेला तिरंगा आणि सचिनच्या नावाचे टीशर्ट घालून मोठ्या संख्येने चित्रपटगृहात अवतरले. त्यामुळे मॉल नव्हे क्रिकेटचे मैदान असल्याचा भास होत होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुधीर कुमार हा सर्वात मोठा चाहता आहे. हे आपल्या सर्व क्रिकेट चाहत्याना माहिती आहे. तो नेहमीच सचिन तेंडुलकर याचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी अगदी वेळेवर पोहोचायचा. विशेष म्हणजे शरीरावरती देशाचा तिरंगाध्वज पेंट केलेला असायचा तर छातीवर सचिन तेंडुलकर हे नाव लिहिलेले असायचे. अगदी तसाच बाबा भोईर आहे. बाबाने 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचे 280 सीट्स असलेला अख्खा शोच बुक केला. विशेेष म्हणजे त्याने केक कापून सेलिब्रेशनही केले.

विशेष म्हणजे चित्रपट गृहात सचिन ए बिलियन ड्रीम्स पाहण्यासाठी जात असताना चाहत्यांनी गालावर तिरंगा पेंट केला होता, तर कोणी भारताचा ध्वज हातात पकडलेला होता. तसेच बच्चे कंपनीने देखील सचिनचा 10 या नंबरचा शर्ट परिधान केला होता. 280 सीट्सचे तिकीटे बाबा भोईर मोफात दिले. यामध्ये बालगोपाळासह मोठ्यांचा सहभाग होता. चित्रपट पाहताना क्रिकेट चाहत्यांनी कल्लोळ करत सचिन, सचिन अशा घोषणा दिल्या. नंतर चित्रपटाचे नाव असलेला केक कापण्यात आला. चित्रपटगृहात क्रिकेटचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ आपण क्रिकेट स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्याच थेट प्रेक्षपण तर पाहात नाही ना, असा भास नक्कीच क्रिकेट रसिकांना झाला असेल. शुक्रवारी करार, ताटवा, ओली की सुकी, खोपा हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र सचिन तेंडुलकरच्या अशा जबरा फॅनमुळे 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट नक्कीच उच्च शिखर गाठेल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... हातात राष्ट्रध्वज, गालावर पेंट केलेला तिरंगा आणि सचिनच्या नावाचे टीशर्ट घालून चित्रपटगृहात अवतरल्या प्रेक्षकांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...