आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष द्यायला मला आता वेळ नाही: सदाभाऊ खोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड़- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेष पदयात्रेकडे पाठ फिरवणारे स्वाभिमानी नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील शेतकरी आठवडी बाजाराच्या उदघाटनाला मात्र उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी पुन्हा एकदा खोत यांनी राजू शेट्टी यांना चिमटा काढला. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत ही नाही. तर जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा आणि छोटा होत असतो. अशी मार्मिक टीका करत मी पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शिवारावरील संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचं ही खोत यांनी जाहीर केलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना फसवलं असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. याला उत्तर देताना राज्यमंत्री सदाभाऊ म्हणाले की, कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष द्यायला मला आता वेळ नाही, माझं लक्ष हे राज्यातील शेतकरी त्याची शेती आणि सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे आहे. हे सर्व डोळ्यासमोर ठेऊन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणी काय समजावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही स्पष्ट दिशा घेऊन काम करत आहे. मी राज्यातील शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांच्या सोबत चालत आहे अस म्हणत त्यांनी शेतकरी संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...