आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी सन्मान, 'चार नगरांतील माझे विश्व'ला बहुमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. 'चार नगरांतील माझे विश्व' या आठवणी संग्रहासाठी ७६ वर्षीय नारळीकरांना हा बहुमान मिळाला. ताम्रपट, शाल व एक लाख रुपयांचा चेक असे त्याचे स्वरूप आहे. नवी दिल्लीमध्ये ९ मार्च २०१५ राेजी पुरस्कार प्रदान होईल. वाराणसी, केंब्रिज, मुंबई व पुण्यातील वास्तव्याचे अनुभव नारळीकरांनी "चार नगरांतील माझे विश्व'मध्ये मांडले आहेत.
डोंगरे, पुरंदरेंना सन्मान : 'स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट' कादंबरीसाठी अवधूत डोंगरे यांना युवा पुरस्कार, तर बालसाहित्यातील योगदानासाठी माधुरी पुरंदरे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.