आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य महामंडळाच्या नियोजनात गाेंधळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डोंबिवली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची नावे सुचवण्यासाठी १२ ऑक्टोबपर्यंत मुदत आहे. मात्र, शनिवार-रविवार अाणि दसरा सुट्यांमुळे उमेदवारांचे अर्ज निर्धारित मुदतीत साहित्य महामंडळापर्यंत पोहोचणे अवघड आहे. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत सोमवारी तीन अर्ज दाखल झाल. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करून १२ ऑक्टोबरला सायंकाळी हे अर्ज साहित्य महामंडळाच्या नागपूर कार्यालयात पोहोचणे आता कठीण आहे, याकडे मसापने लक्ष वेधले आहे.

तीन उमेदवारांचे अर्ज
ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवणारा अर्ज सोमवारी मसापमध्ये दाखल झाला. काळे यांचे नाव भारत सासणे यांनी सुचवले आहे, तर अरुण जाखडे, प्रदी निफाडकर, रेखा इनामदार साने, अंजली कुलकर्णी आणि डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी अनुमोदन दिले आहे. दुसरा अर्ज जयप्रकाश घुमटकर यांनी दाखल केला आहे. तसेच साताऱ्याचे कवी, पत्रकार श्रीनिवास विनायक वारुंजीकर यांनीही अर्ज दाखल केला. किसन पवार हे सूचक असून मधुसुदन पतकी, श्रीराम रानडे, दिलीप डाेंगरे, रमेश नावडकर हे अनुमाेदक अाहेत.
बातम्या आणखी आहेत...