आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saint Tukaba Palkhi News In Marathi, Dehu, Divya Marathi, Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देहूत वैष्णवांचा मेळा; संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान, माउलींची पालखी आज निघणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीक्षेत्र देहू  येथे गुरुवारी सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन आमदार बबनराव पाचपुत - Divya Marathi
श्रीक्षेत्र देहू येथे गुरुवारी सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन आमदार बबनराव पाचपुत
पुणे - उत्कट भक्तिभावाने देहूमध्ये जमलेल्या हजारो वैष्णवांच्या मुखी असलेल्या विठुरायाच्या जयघोषात गुरुवारी तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. नगर प्रदक्षिणा करून तुकोबांची पालखी वारीच्या पहिल्या मुक्कामासाठी देहूमधील इनामदार वाड्यात गेली. शुक्रवारी सकाळी पालखी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल. दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी आळंदीहून प्रस्थान करणार आहे.

दोन दिवसांपासूनच देहूनगरी हजारो भाविकांनी गजबजली होती. गुरुवारी सोहळाप्रमुख मोरे कुटुंबीय, दिंडीचे मानकरी, पालखीचे मानकरी देहूमधील शिळा मंदिर, नारायण महाराज समाधी, वैकुंठागमन मंदिर, रुक्मिणी-विठ्ठल मंदिर येथे महापूजा बांधण्यात गुंतले होते. सकाळी दहाच्या सुमारास हे विधी संपले आणि दर्शनासाठी वारक-यांची झुंबड उडाली. दुपारी तीनच्या सुमारास प्रत्यक्ष पालखी प्रस्थानाची तयारी सुरू झाली. तुकोबांच्या पादुका मुख्य देऊळवाड्यात नेऊन पूजा करण्यात आली. चारच्या मुहूर्तावर पालखीचे प्रस्थान झाले. मानक-यांनी पालखी खांद्यावर घेत मिरवत नेली. नगर प्रदक्षिणेनंतर पालखी इनामदारवाड्यात मुक्कामाला गेली.

अपूर्व योगायोग
तुकोबांच्या पालखीचे हे 329 वे वर्ष आहे. योगायोगाने यंदा पालखी सोहळ्यातील दिंड्यांची संख्याही नेमकी 329 इतकी आहे. यंदा कुठल्याही नव्या दिंडीला परवानगी देण्यात आलेली नाही, असे सोहळाप्रमुख मोरे कुटुंबीयांनी सांगितले

स्वतंत्र संकेतस्थळ
वारक-यांना सुविधा पुरवण्यासाठी पुणे महापालिकेने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पालखीसेवापुणे डॉट इन, असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे. पालखी पुण्यात असेपर्यंत हे संकेतस्थळ सतत अपडेट केले जाणार आहे.
जीवनावश्यक सुविधा, पाणी, आरोग्य, अन्नदान, स्वच्छतागृहे अशा अनेक सुविधांची माहिती यातून वारक-यांना मिळेल. तसेच ऑनटॅप या अ‍ॅपद्वारेही सर्व माहिती वारक-यांपर्यंत पोचवली जाणार आहे.

वारक-यांना टोलमाफी
पंढरीच्या वारीला निघालेल्या वारक-यांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येत असल्याचेही बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

तुकोबांच्या पालखीची रिंगणे
1) 29 जून : गोल रिंगण (बेलवडी)
2) एक जुलै : गोल रिंगण (इंदापूर)
3) 4 जुलै : गोल रिंगण (माने विद्यालय)
4) 5 जुलै : उभे रिंगण (माळीनगर)
5) 8 जुलै : उभे रिंगण पंढरपूर
6) सहा जुलै : धावा

इमर्जन्सी मेडिकल सेवा
वारी मार्गावरील तिन्ही जिल्ह्यांत (पुणे, सातारा, सोलापूर) 51 मार्गांवर इमर्जन्सी अ‍ॅम्ब्युलन्स सेवा तैनात केली जाणार आहे. 108 या क्रमांकाची ही सेवा सर्व प्रकारच्या तातडीच्या वैद्यकीय सेवा पुरवणार आहे. साथीचे आजार, ताप, सर्दी, अपचन, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आदी विकारांनी ग्रस्त वारक-यांना त्यामुळे दिलासा मिळेल. ज्या गावी पालखीचा मुक्काम असेल तेथेही ही सेवा मिळेल.