आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम शेख हत्येच्या प्रयत्नात 2 अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र केसरी संजय पाटील याचा 2010 मध्ये कराड येथे सराईत गुन्हेगार सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सलीम शेखची हत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सांगली येथील दोन आरोपींना पुणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

बाळकृष्ण ऊर्फ पांडया लक्ष्मण मोहिते (वय-27) व अभिजीत रामचंद्र गायकवाड (29) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोघांकडून 75 हजार 800 रुपये किंमतीच्या दोन पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व दोन मोबाइल फोन असा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी सांगितले की, सदर पथकास दोन इसम सांगली येथून पिस्टल घेऊन पुण्यात आल्याची माहीती मिळाली. त्यांना कात्रज येथे सापळा रचून अटक करण्यात आली व त्यांच्याकडून दोन पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी ही पिस्टल मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणल्याचे तपासात सांगितले आहे. सदर आरोपी हे काही दिवस पिंपरी-चिंचवडमधील एका माजी नगरसेवकाचे अंगरक्षक होते. त्यांच्याविरोधात सांगली येथे खून, दुखापत, शस्त्रास्त्रविरोधी कायद्याचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.