आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडने हटवला राम गडकरी यांचा पुतळा, पुण्यात चार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी यांनी नाटक आणि पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी पहाटे पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी उद्यानातील प्रवेशद्वाराजवळ असलेला गडकरींचा पुतळा काढून जवळ असलेल्या मुठा नदीच्या पात्रात फेकून दिला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २३ जानेवारी १९६२ राेजी राम गणेश गडकरी यांच्या ४२व्या पुण्यातिथीनिमित्त पुतळा बसवण्यात आला होता. याचे अनावरण अाचार्य प्र.के.अत्रे यांच्या हस्ते करण्यात आले हाेते. मात्र, मंगळवारी पहाटे अडीच्या सुमारास संभाजी  ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांनी हा पुतळा काढून टाकला. डेक्कन पाेलीस ठाण्यात महापालिकेच्या उद्यान प्रमुखांनी िफर्याद दाखल केली असून चार अाराेपींना पाेलीसांनी अटक करत पुढील चाैकशी सुरू केली अाहे.

संभाजी ब्रिगेडचे हवेली तालुका अध्यक्ष हर्षवर्धन महादेव मगदूम (२३), वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद संघटेनेचा अध्यक्ष प्रदीप भानुदास कणसे (२५)] स्वप्निल सूर्यकांत काळे (२४) व गणेश देविदास कारले (२६)अशी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

पुतळा पुन्हा उभारणार
छत्रपती संभाजी उद्यानात सध्या माेठया प्रमाणात पुर्नबांधणीचे काम सुरू असून यादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गडकरींचा पुतळा हटवला असल्याचे संागून महापौर प्रशांत जगताप यांनी या घटनेचा निषेध केला. हा प्रकार समाजात तेढ निर्माण करणारा असून महापालिकेच्या वतीने पुन्हा याच ठिकाणी राम गडकरी यांचा पुतळा पुर्ववत बसविण्यात येर्इल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी या प्रकरणी नगरसेवकांनी तीव्र अाक्षेप नाेंदवल्यानंतर अतिरिक्त अायुक्त राजेंद्र जगताप यांनी संभाजी उद्यानाच्या दाेन सुरक्षारक्षकांना नोटीस बजावली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...