आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम गडकरींचा पुतळा बसवल्यास पुन्हा हटवणारच, संभाजी ब्रिगेडचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा  पुण्यातील संभाजी उद्यानात पुतळा बसवल्यास  तो पुन्हा हटवण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि पुणे शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनी सोमवारी दिला.  छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी केल्याचा अाराेप करत गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक पुतळा बसवला जाईल, असे पुणे मनपाने स्पष्ट करण्यात आले आहे.  

मिटकरी म्हणाले, उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे. त्या जागी संभाजी महाराजांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा बसवला ही बाब चुकीची अाहे. गडकरी यांनी त्यांच्या चिटणीस बखरीवर अाधारित ‘राजसंन्यास’ नाटकात संभाजी महाराजांना चुकीच्या पात्रांच्या अाधारे व्यभिचारी ठरवण्याचा प्रयत्न केला. दंगलमुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असेल तर त्यांनी याबाबत याेग्य न्याय द्यावा. डॉ. दाभाेलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पहिल्यांदा अटक करा. त्यानंतर आमच्याकडे पाहावे, असेही ते म्हणाले.  सत्य इतिहास लाेकांसमाेर येण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राणेंचे प्राेत्साहन नाहीच
काँग्रेस नेते अामदार नितेश राणे यांनी राम गणेश गडकरींविराेधात मांडलेली जाहीर भूमिका एक वर्षापूर्वीची असून त्याने प्रेरित हाेऊन ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा हटवला नसल्याचे ते म्हणाले. राणे यांनी हे कृत्य करणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले हाेेते.
 
राजकारणासाठी पुतळ्याचा वापर नाही   
संभाजी ब्रिगेडने सक्रिय राजकारणात उतरण्याची भूमिका घेतली असून त्या दृष्टीने पक्षाची उभारणी केली अाहे. अागामी निवडणुकीच्या अनुषंगानेच त्यांनी गडकरी यांचा पुतळा हटवल्याची चर्चा हाेत अाहे. मात्र त्याचे खंडन करताना शिंदे म्हणाले, ब्रिगेडच्या मागण्यांची दखल न घेता अाम्हाला तालिबानी ठरवले जात अाहे.राजकारणासाठी अामच्याकडे अन्य मुद्दे असून गडकरींच्या पुतळ्याचे आम्हाला राजकारण करायचे नाही.’
बातम्या आणखी आहेत...