आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडला अाणखी एक स्फाेटकाचे पाकिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संभाजी ब्रिगेडचे अजय भाेसले यांच्या पाठाेपाठ ब्रिगेडचे सतीश चव्हाण यांच्या नावाने एक स्फाेटकाची पाकिट प्राप्त झाले अाहे. जिलेटिन व डिटाेनेर्टस असलेले सदर पाकिट त्यांनी पाेलिसांना दिले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडे देण्यात अाला अाहे.
संभाजी ब्रिगेडच्या मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात सतीश चव्हाण स्वागताध्यक्ष हाेते.
पुण्यातील कॅम्प भागात त्यांचे व्यावसायिक कार्यालय अाहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांचे कार्यालयात एक पाकिट अाले हाेते, मात्र काही कामािनमित्त ते शहराबाहेर असल्याने त्यांनी सदर पाकिट शुक्रवारी फाेडले. त्यावेळी सदर पाकिटात जिलेटिन व डिटाेनेर्टस असल्याचे अाढळून अाले. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत काेकाटे, यांच्यासह एका पक्षाच्या नावावर लाल रंगाची फुली मारलेली वृत्तपत्राची कात्रणे हाेती. चव्हाण यांनी त्यानंतर सदर पाकिट पाेलिसांच्या ताब्यात दिले अाहे.

सूत्रधार पुण्याचा : गुन्हे शाखेचे अतिरिक्त पाेलीस अायुक्त सी.एच. वाकडे म्हणाले की, चव्हाण व भाेसले यांना मिळालेली पाकिटे सारखी असून ती एकच दिवशी पाेस्टामार्फत पाठवण्यात अालेली अाहे. रासायनिक प्रयाेगशाळेत या पाकिटांची तपासणी केली असता त्यामध्ये अमाेनियम-साेडियम नायट्रेट हा स्फाेटक पदार्थ िमळालेला अाहे. ते सहज बाजरात उपलब्ध हाेतात. ही पाकिटे पुण्यातून पाठवण्यात अाली असून सूत्रधारही इथलाच असण्याची शक्यता अाहे.’
बातम्या आणखी आहेत...