आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी, संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पंचनामा या फेसबुक पेजवरून तुमचा दाभोळकर करू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने पुण्याच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती क्राईम ब्रॅंचचे अप्पर आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी दिली आहे. पंचनामा फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनाही जीवे मारण्याची धमकी तीन-चार दिवसापूर्वी दिली होती.
संभाजीराजे यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयोजनावर करोडो रूपये खर्चास विरोध केला होता. गांझा पिणा-या व अंधश्रद्धा पैलविणा-या साधूसंतावर कोटयावधी रूपये खर्च करण्यापेक्षा सरकारने कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी भूमिका संभाजीरानेंनी घेतली होती. त्यावरून पंचनामा या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. '...तर तुमचाही दाभोळकर होईल, हे लक्षात ठेवा' असा मजकूर पेजवर टाकला गेला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
पुढे वाचा, शिवाजी महाराज- अफझलखान यांच्या भेटीच्या प्रसंगाच्या फोटोमध्ये अफझलखानाऐवजी संभाजीराजेंचा फोटो...