आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sammelan Consider Marathi Peoples Emotions Dr. Jabbar Patel Expection

मराठी माणसांच्या भावनांची दखल संमेलनांनी घ्यावी, डॉ. जब्बार पटेल यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - साहित्य काय वा नाटक काय, त्यांच्या अभिव्यक्तीसाठी भाषा हेच माध्यम लागते. त्यामुळे याबाबत मराठी माणसांच्या भावनांची दखल संमेलनांनी घ्यायला हवी, अशी भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.
‘बेळगाव महाराष्ट्रात सामील करून घेण्याचा प्रश्न राजकीय असून, तो बेळगावमधील मराठी माणसांनीच सोडवावा,’ असे वादग्रस्त विधान नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नुकतेच बेळगावमध्ये केले. त्यावरून उडालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पटेल बोलत होते.

ते म्हणाले, नाटक हे भाषेशिवाय पूर्ण होत नाही. साहित्याला व नाटकाला आविष्कारासाठी भाषा हेच माध्यम लागते. मग साहित्य संमेलन पंजाबमध्ये घुमानला होवो किंवा नाट्य संमेलन कर्नाटकात बेळगावमध्ये होवो, ते मराठी भाषेतूनच होणार आहे. मात्र यासंदर्भात मराठी माणसाच्या भावनांची नोंद या संमेलनांनी घ्यायला हवी.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘भाषेमुळे माणसे जोडली जात असतील, तर नाटक हा सर्वांना जोडणारा सेतू ठरला पाहिजे. नाटकाचा उगम कर्नाटकात झाला असेल, तर नाट्यसंमेलन बेळगावात होण्यास हरकत काय आहे? नाट्य संमेलन हे राजकीय व्यासपीठ असू नये, असे मात्र वाटते.