आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मोतेवारांना 'ससून'मधून डिस्चार्ज, पुन्हा उस्मानाबादकडे रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- समृद्ध जीवन अॅंड फूड्स कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना आज दुपारी 12 च्या सुमारास ससून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महेश मोतेवार यांना गुरूवारी सोलापूरहून पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर उमरगा येथील तुरुंगातून मोतेवार यांना प्रथम सोलापूरला आणण्यात आले होते. सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गुरुवारी रात्री पुण्यातील ससूनमध्ये दाखल केले होते. चिटंफडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या मोतेवारांना पुन्हा उस्मानाबादला नेण्यात येत आहे.
मोतेवार यांचा जुना आजार बळावला व छातीत दुखत असल्याची तक्रार मोतेवार यांनी केली होती. मात्र, ससूनमधील डॉक्टरांनी दीड दिवस उपचार केल्यानंतर मोतेवार यांची प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल उमरगा कोर्टाला दिला आहे. मोतेवार यांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपल्याने कोर्टाने मोतेवार यांचा वैद्यकीय अहवाल मागवला होता. तसेच मोतेवार यांच्या तब्बतेबाबत तासा-तासाला अपडेट आम्हाला कळवावे असे कोर्टाने ससून रूग्णालयाला आदेश दिला होता. त्यानुसार ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी कोर्टाला मोतेवार यांचा वैद्यकीय अहवाल एक-एक तासाला दिला व मोतेवार यांना कोणताही विशेष त्रास नसल्याचे सांगितले.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी महेश मोतेवार यांना सोमवारी (28 डिसेंबर) उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांना उस्मानाबाद येथे नेण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर मोतेवार यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करणे अपेक्षित होते. मात्र, तुरुंगातच तब्बेत बिघडल्याने त्यांना प्रथम सोलापूरला व नंतर पुण्यातील रूग्णालयात दाखल केले होते.
महेश मोतेवार यांना अटक केल्यानंतर सीबीआयने मंगळवारी समृद्ध जीवनशी संबंधित कार्यालये, बॅंक, संचालकांची निवासस्थाने अशा 58 ठिकाणी छापे टाकले होते. पुण्यातील 40 ठिकाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर येथील प्रत्येकी एक तर ओडिशात दोन कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. चिटफंड घोटाळ्यात समृद्ध जीवन कंपनीच्या विरोधात सीबीआय तपास करत आहे. अधिकृतरीत्या कोणतीही परवानगी न घेता सामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीकरिता चिटफंडच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचा समृद्ध जीवनवर आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...